(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sachin Pilot Meets Jyotiraditya Scindia | सचिन पायलट यांच्याकडून ज्योतिरादित्य शिंदेंची भेट
नवी दिल्ली : मध्य प्रदेश नंतर काँग्रेसला राजस्थानमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, राजस्थानमधील काँग्रेसचे मोठे नेते सचिन पायलट उद्या भाजप पक्षात प्रवेश घेण्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करतील. काँग्रेस, सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यास अपयशी ठरल्यामुळे सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाण्याच निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
30 आमदारांचे समर्थन असल्याचा पायलट यांचा दावा
माझ्याकडे 30 आमदाराचं समर्थन असून राजस्थानचे अशोक गहलोत यांचे सरकार अल्पमतात असल्याचे काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले. कोणत्या 30 आमदारांचे समर्थन आहे, हे मात्र समजू शकले नाही. दुसरीकडे काँग्रेस सुत्रांनी रविवारी रात्री अशोक गहलोत यांच्या बैठकीत 90 आमदारांची उपस्थिती असल्याचा दावा केला आहे.