Raj Thackeray विदर्भाच्या दौऱ्यावर,राज ठाकरेंकडून भाजप नेत्यांच्या गाठीभेटी : ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी राज यांनी बैठकांचं सत्र सुरु केलं.. पक्ष संघटना वाढवायची असेल प्रस्थापितांशी लढावं लागेल, त्यांच्या अंगावर जावं लागेल असा कानमंत्र राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय... तर दुसरीकडे राज ठाकरे नागपुरात भाजप नेत्यांच्या गाठीभेटीही घेतायत. राज ठाकरे आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत... या भेटीचा राजकीय अर्थ नाही असं बावनकुळे यांनी सांगितलंय.. राज ठाकरेंशी १८ वर्षांपासूनचे संबंध असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय.. तत्पूर्वी राज यांनी काल केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरुन कौतुक केलं... यावेळी दोन्ही नेत्यांनी फुटाळा तलावातील लेझर शोचा आनंदही लुटला...




















