Pankaja Munde Beed : माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलक नाहीत : पंकजा मुंडे : ABP Majha
बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा प्रचार सध्या जोरदार सुरु आहे. अशातच पंकजा या माजलगाव तालुक्यात प्रचारासाठी गेल्या असता त्यांचा ताफा दोन ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवला होता. आणि त्यांच्यासमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावरच पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या वेळी पण आपला ताफा अडवून अशी घोषणाबाजी करण्यात आली होती आणि हा प्रकार दुसऱ्यांदा झाल्याने हे मराठा आंदोलक असू शकत नाहीत. कारण आंदोलक हे चर्चा करण्यासाठी तयार असतात हा तर पूर्वनियोजित कट असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. बीड जिल्ह्यात 40 उमेदवार फिरतात मग हा अनुभव आपल्याच वाट्याला का यावरुन मनाला वेदनाहोत असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या.






















