Nawab Malik :आमदार मलिक यांचा जामिनाचा आज अखेरचा दिवस,कोर्ट नंबर 14 मध्ये आज 61 व्या नंबर वर सुनावणी
Nawab Malik : ज्या विधीमंडळातून राज्याच्या कारभाराचा गाडा हाकला जातो, त्या विधीमंडळात आज विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाची मतांची जुळवाजुळव सुरू आहे. अशातच क्रॉस व्होटिंग, घोडेबाजाराच्या चर्चांचाही धुरळा सध्या राज्याच्या राजकारणात उडाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांचा आज जामिनाचा शेवटचा दिवस आहे. पुन्हा आणखी मुदतवाढ मिळण्यासाठी नवाब मलिक यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडे अर्ज करण्यात आला आहे. मात्र, आज सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ न मिळाल्यास त्यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपिठापुढे सुनावणी पार पडणार असून कोर्ट नंबर 14 मध्ये आज 61 व्या नंबर वर सुनावणी आहे. अशातच नवाब मलिक आज विधान परिषदेसाठी मतदान करणार की नाही? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे ही पाहा :
MLC Election Special Report : उमेदवार बारा; जागा अकरा, कोण बळीचा बकरा?