एक्स्प्लोर
Pawar Politics: 'अजित पवारांना माझी भूमिका माहित आहे', Chhagan Bhujbal यांचे वक्तव्य, NCP मध्ये अंतर्गत कलह?
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वक्तव्यांमुळे पक्षात धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. 'जे हिरवे साप फणा काढतील त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे', असे वादग्रस्त विधान आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. तर दुसरीकडे, सरकारमध्ये मंत्री असूनही छगन भुजबळ यांनी ओबीसी बचाओचा नारा देत सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. आपली भूमिका अजित पवारांना माहित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या सर्व घडामोडींवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समाजात तणाव निर्माण होईल अशी वक्तव्ये करणे चुकीचे असल्याचे सांगत, जातीय सलोखा राखण्याचा आणि प्रेमाची भाषा वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
राजकारण
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























