Gunaratna Sadavarte : उद्धव ठाकरे-राज ठाकरे किरकोळ, होलसेल दुकान उघडणार आहेत का?
मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत केलेले सुतोवाच आणि त्याला उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद या पार्श्वभूमीवर ही चर्चा यावेळी प्रत्यक्षात साकार होण्याची आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले आहेत. त्याला काल (शनिवारी) उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घडामोडींवरती ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
गुणरत्न सदावर्ते प्रतिक्रिया देताना म्हणाले, सबकुछ फिल्मी हैं, स्वत: प्रोडक्शन काढणे आणि महेश मांजरेकरांना डायरेक्टर करणे, हे सगळं फुल टू फिल्मी आहे. हा ड्रामा सिरिअस सुद्धा मी म्हणणार नाही. दोन्ही राजकीय पक्षांचे काय अस्तित्व आहे. राज ठाकरेंची लोकं विधानसभा आणि लोकसभेत आहे का? एक दोन इव्हेंट ते घेतात. उद्धव ठाकरे मामूजान, भाईजान करतात, किती त्यांना समजलं आणि किती न्याय हक्कासाठी ते उभं राहातात सर्वांना माहिती आहे. वक्फमुळे लोकांना त्रास होतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही किरकोळ, काय होलसेल दुकान उघडणार आहे का? कोणता ब्रॅंड? चिन्ह टिकू शकतं का? किती मतं आहेत?
हिंदुत्वापासून दूर गेलेत असंही पुढे गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या























