एक्स्प्लोर

Sanjay Raut On Devendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस क्रूर, अनितीमान आणि भ्रष्ट माणूस: संजय राऊत

नवी दिल्ली: देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मी कोणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी कोणी लागलं तर मी सोडत नाही. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादी लागूनच दाखवावे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि फडणवीसांना आव्हान दिले. फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या नादी लागणार म्हणजे काय करणार, पोलिसांना, ईडी किंवा सीबीआयला आमच्या मागे लागणार. फडणवीसांना कोणी म्हटलं आमच्या नादी लागू नका. लोकसभा निवडणुकीत ते आमच्या नादी लागले आणि त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा आमच्या नादी लागावेच, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी भाजप, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. देवेंद्र फडणवीस नामर्द, लफंगे आणि #$ लोकांची टोळी घेऊन आमच्या नादी लागणार आहेत का? तुमच्याकडे तेवढी छाती आणि हिंमत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर ईडी आणि सीबीआयची कवचकुंडलं बाजूला ठेवून लढा आम्ही तुम्हाला 20 फूट खाली गाडल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी सुरु करण्यात आलेल्या "ताई, माई, अक्का" या मोहिमेविषयी विचारण्यात आले. तेव्हा संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचताना अत्यंत शेलकी भाषा वापरली. जर मी म्हणालो की ताई माई अक्का माझा पक्ष *क्का, असे मी बोललो तर चालेल का? पण मी तसे बोलणार नाही, असे राऊतांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस क्रूर, अनितीमान आणि भ्रष्ट माणूस: संजय राऊत

महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या राजकारणात एका संस्कृतीचे पालन केले जात होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी लफंग्या टोळीला हाताशी धरुण दळभद्री राजकारण सुरु केले. त्यामुळे आज महाराष्ट्राची ही अवस्था आहे. उद्धव ठाकरे यांनी, एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तलवार उपसली आहे. ते फडणवीसांना तुम्ही नाही तर तू असे एकेरीत बोलले. देवेंद्र फडणवीस हे संघाच्या विचारांचे आहेत. पण त्यांनी आजपर्यंत कोणती संस्कृती, कोणते नीतीनियम पाळले? जे संघाला नीतिमान आणि प्रखर राष्ट्रवादी मानतात त्यांना मी देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण देतो. माणूस किती क्रूर, भ्रष्ट आणि अनितीमान असतो, हे फडणवीसांकडे पाहून कळते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कपटी आणि कारस्थानी लोकांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदनाम झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याविषयी विचारले असता राऊतांनी त्यावर फारसे बोलणे टाळले. देवेंद्र फडणवीस यांना भाजपने आंतरराष्ट्रीय अध्यक्ष करावे. त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

राजकारण व्हिडीओ

Bhaskar Jadhav Pc : शिवसेनेनं संधी दिली नाही असं बोललो नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण
Bhaskar Jadhav Pc : शिवसेनेनं संधी दिली नाही असं बोललो नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.