CM Eknath Shinde Delhi : दिल्लीत वीर बालदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भाषण
CM Eknath Shinde Delhi : दिल्लीत वीर बालदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भाषण
हिवाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरु होतोय. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत रवाना आहेत. या दौऱ्यात ते अमित शाहांना भेटण्याची शक्यता आहे. आणि जर ही भेट झाली तर महाराष्ट्रविरोधी वक्तव्य करणाऱ्या बोम्मईंची तक्रार करणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या वीर बालदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहिले. मुख्यमंत्री दिल्लीत जाणार असल्यानं, आज नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात कर्नाटकविरोधी ठराव मांडला जाण्याची शक्यता कमीच आहे.



















