CM Eknath Shinde And Devendra Fadnvis यांच्याकडून आमदारांच्या नाराजीची दखल : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री उशिरा नंदनवन बंगल्यावर बैठक झाली. मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना सर्वाधिक स्थान मिळणार आहे, तसंच महामंडळांचे देखील लवकरात लवकर वाटप करून अधिकाधिक आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जरी सत्तेत सोबत असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, ही बाब शिंदे आणि फडणवीस आपापल्या आमदारांना पटवून देणार आहेत, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.


















