(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram kadam On Ghatkopar Hording : राम कदमांकडून भावेश भिडेंचा ठाकरेसोबतचा फोटो ट्विट : ABP Majha
घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झालाय. हे होर्डिंग ज्या जागेत उभ होतं.. ती जागाच मुळात रेल्वे पोलिसांची असल्याची बाब एबीपी माझाच्या पाठपुराव्यात समोर आलीय. या जागेवर कोणतीही नियम न पाळता हे अनधिकृत होर्डिंग उभं करण्यात आलं होचं..शिवाय जो पेट्रोल पंप या ठिकाणी चालवण्यात येत होता.. तो देखील रेल्वे पोलिसांचा होता ही बाब एबीपी माझाच्या हाती लागलीय. तर दुसरीकडेहे होर्डिंग उभारण्यासाठी जी पायाभरणी करण्यात आली होती तीच मुळात कमकुवत होती, एन डी आर एफ च्या माहितीनुसार या ठिकाणी किमान सात ते आठ मीटर खोल पायाभरणी करण्याची आवश्यकता होती मात्र इथे केवळ तीन मीटर पायाभरणीच करण्यात आली होती.. त्यामुळे या सगळ्याला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येते.. दरम्यान भावेश भिडे नेमका कोणाचा पार्टनर आहे? तसंच संजय राऊत आणि सुनील राऊतांशी या भावेशचे काय संबंध आहेत? असा सवाल भाजप आमदार नितेश राणेंनी घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी विचारला