Ajit Pawar on Maharashtra Budget 2023 : फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला, अजित पवारांची टीका
Ajit Pawar on Maharashtra Budget 2023 : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. होतं नव्हतं ते जाहीर करा पुढचं पुढं बघू अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे, असे अजित पवार म्हणाले. वीज गॅस पाणीपुरवठा सेवा याकडे आजच्या अर्थसंकल्पात निधी नाही. तुकाराम महाराज यांच्या देहूसाठी कही घोषणा करतील असं वाटलं माञ काहीचं केलं नाही. अरबी समुद्रातील शिवाजी महाराज स्मारक बाबत काहीचं घोषणा नाही, असे अजित पवार म्हणाले.
मी अर्थ संकल्प मांडला पंचसूत्र मांडल यांनी विकासाच पंचामृत यांनी मांडलं आहे मुळात अमृत कोणी बघितला नाही. आधीच्या योजनांबाबत काय झालं विकास कामांवर निधी खर्च होतं नाही. काही जिल्ह्यात 4 टक्के 5 टक्के निधी खर्च झाला आहे. बजेचा खर्च पाहिला तर 51 टक्के खर्च झाला आहे. आता 20 दिवसांत उरलेला 50 टक्के निधी हे खर्च करणार कसे आहेत, असे अजित पवारम म्हणाले.