Gunratna Sadavarte : खुर्चीवर चढून हर हर महादेवच्या घोषणा, वेगळ्या मराठवाड्याची मागणी ABP Majha
Separate Marathwada: स्वतंत्र विदर्भाच्या मागणी पाठोपाठ आता मराठवाडा (Marathwada) स्वतंत्र राज्य करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. याच विषयामध्ये उद्या उस्मानाबाद जिल्ह्यात संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विकासासाठी समर्पक निधी दिला गेला नाही, यामुळे मराठवाड्याला अविकसितपणाचा कलंक लागल्याचा आरोप केला जात आहे. तर गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठवाड्याचा भाग दुर्लक्षित ठेवण्यात आला असून, राजकीय नेतृत्वामुळे असे झाला असल्याचा आरोप होत आहे. मराठवाडा आणि विदर्भ जेव्हापासून वेगळा करण्यात आला तेव्हापासून आम्हाला विकासापासून दूरू ठेवण्यात आल्याचा देखील आरोप झाला. त्यामुळे यासर्व मागण्या घेऊन उद्या उस्मानाबाद येथे वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीसाठी संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.


















