Raut vs Mahajan राऊत विरुद्ध महाजन: 'दलाल' शब्दावरून वादाचा नवा सीझन
महाराष्ट्राच्या राजकारणात जुन्या वादाचा नवा सीझन सुरू झाला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. राऊतांनी महाजन यांना 'पक्ष फोडण्यासाठी नेमलेले दलाल' म्हटले, तर महाजनांनी राऊतांच्या दलालीमुळे शिवसेनेचे नुकसान झाल्याचा आरोप केला. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जुन्याच वादाचा नवा सीझन सुरू झालाय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल केलेल्या भाकितानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला. गिरीश महाजन हे पक्ष फोडण्यासाठी नेमलेले दलाल आहेत, असा निशाणा राऊतांनी साधलाय. जर सत्तांतर झाल्यावर भाजप सोडणारे पहिले महाजन असतील, असंही राऊत म्हणतायत. तर संजय राऊतांएवढी दलाली आजवर कुणी केली नसेल. राऊतांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झालं असा जोरदार प्रत्युत्तर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेला आहे. तर गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राऊत विरुद्ध महाजन हा सामना पाहायला मिळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटत त्या जमीनदोस्त देशद्रोहीच्या मार्गावर आहे. त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत. मला वाटत स्वतः उद्धवजी परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेले नाही आहेत. पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजूतून, खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठीचे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागताहेत, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवर बसवलं, काँग्रेसच्या मांडीवर बसवलं आणि त्या मधली दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटत आजपर्यंत कोणी केली नसेल. आता बातमी नाशिक मधून। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर पक्षामध्ये नाराज आहेत अशी चर्चा आहे. नाशिक मध्ये कालच त्यांनी फडणवीसांची भेट घेतली होती. यानंतर त्यांच्या नाराजीची चर्चा आणखी वाढली आहे. खुद्द त्यांनी ही चर्चा मान्य केली आहे. पक्ष संघटनेत झालेल्या बदलांमुळे बडगुजर नाराज आहेत. त्यांच्यासोबत विलास शिंदे देखील नाराज आहेत अशी ही माहिती आहे. तर राऊतांची बडबड बंद झालेली नाही त्या ठाकरेंच्या शिवसेनेत कुणीही शिल्लक राहणार नाही, असं टोला गिरीश महाजनांनी लगावलंय. तिकडे बडगुजर यांच्या नाराजीच्या चर्चेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र खळबळ भासली आहे अशी ही चर्चा आहे.
























