एक्स्प्लोर
Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य, तक्रारदार रंजना गावंदे यांची प्रतिक्रिया
पुत्र प्राप्तीसाठी सम-विषम फॉर्म्युला सांगणाऱ्या इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात pcpndt कायद्यानुसार संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी आज होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. दरम्यान या प्रकरणात ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांनी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल केला जात नव्हता, असा आरोप केलाय. इंदोरीकर महाराज यांचे वक्तव्य महिलांसाठी अन्यायकारक आणि कायद्याविरोधात असल्याने तक्रार दाखल केल्याचा त्यांचा दावा आहे
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















