Nashik Shinde Group : नाशकात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाकडून हवेत गोळीबार
Nashik Shinde Group : नाशकात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाकडून हवेत गोळीबार
नाशिक शहरातील देवळाली गाव परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात गुरुवारी सायंकाळी बाचाबाची झाली यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटेंच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार देखिल केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आगामी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या देवळाली गाव परिसरात पारावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदावरून चर्चा सुरू असतांनाच शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये वाद झाले, यावेळी स्वप्निल सूर्यकांत लवटे याने हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज येताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, भितीपोटी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली होती. घटना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा ईथे तैनात करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी संशयित स्वप्नीलला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे.























