Nashik Onion: लिलाव रद्द करा, नाहीतर परवाने रद्द होणार ,कांदा व्यापाऱ्यांना सरकारचा कठोर इशारा
नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव आज सलग दुसऱ्या दिवशी ठप्प आहेत. कांदा व्यापाऱ्यांनी काल सकाळपासून बंद पुकारल्यानं कांद्याचे व्यवहार बंद पडलेत. यातच, शासनानं व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. बंदमध्ये सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने आणि गाळे जप्त होणार आहेत. ही कारवाई बाजार समितीला करावी लागणार आहे, आणि ही कारवाई न केल्यास बाजार समिती संचालक मंडळ आणि सचिवांवर शासनाचं पणन खातं कारवाईचा ब़डगा उचलणार आहे. बाजार समित्यांना आज दुपारी १२ वाजेपर्यंत कारवाईचा अहवाल शासनाला सादर करायचा आहे. दरम्यान, कांदा प्रश्नावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीत व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.