Nashik Honeybee : ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे मधमाशीवर आधारित पर्यटन
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे मधमाशीवर आधारित पर्यटन म्हणजेच ‘अॅपि-टुरिझम’चं देशातील पहिलंच केंद्र स्थापन करण्यात आलंय. तीन वर्षांपूर्वी हे केंद्र सुरु करण्यात आलं असून इथं पर्यटन महोत्सव, राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’परिसंवाद, हनिबी फेस्टिवल, प्राचार्य- मुख्याध्यापक परिषद, फळाफुलांचे प्रदर्शन आणि स्पर्धांचं आयोजन केलं जातं. मधमाश्यांद्वारे परागीभवनातून होणारी उत्पादन वाढ लक्षात घेता या पार्कमध्ये शेतकरी, विद्यार्थी तसेच बेरोजगार युवकांना प्रशिक्षण दिले जाते, या माध्यमातून अनेक युवकांना प्रशिक्षित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. या कार्याची दखल घेऊन बसवंत हनी बी पार्कला जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉनसीबल टुरिझ म या संस्थेचा सन्मानजनक असा “रिस्पॉनसीबल टुरिझम’अवॉर्ड मिळालाय.