Nashik Election : नाशकात तांबे वि. शुभांगी पाटील यांची सरळ लढत, १६ उमेदवार रिंगणात, प्रचंड चुरस
प्रचंड राजकीय थरारनाट्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. नाशिकमध्ये आता १६ उमेदवार रिंगणात असून ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात थेट लढत होणार असल्याचं दिसतंय. कुणाची कुठे ताकद आहे आणि शुभांगी पाटील विरूद्ध सत्यजीत तांबे यांच्यांतील जमेच्या आणि विरोधातील बाजू कोणत्या याबाबत चर्चांना उधाण आलंय. दरम्यान तिकडे नागपुरातही २२ उमेदवार रिंगणात असून भाजप समर्थित नागो गाणार यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या गोटातील तीन उमेदवार रिंगणात आहेत. दुसऱ्या बाजूला संजय राऊतांनी कपिल पाटील यांना विनंती करूनही शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे मैदानातच आहेत. त्यामुळे, जरी शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली असली तरी महाविकास आघाडीसमोरचे संकट अजूनही टळलेले नाही.























