Nashik Drone : नाशिक शहरातील 16 संवेशनशील ठिकाणी ड्रोन उडवण्यास बंदी ABP Majha
नाशिक शहरातील १६ संवेशनशील ठिकाणी ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. अमृतसर येथील आंतरराष्ट्रीय सीमाच्या हद्दीत पाकिस्तानच्या ड्रोनची घुसखोरी झााल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. तर, जम्मू विमानतळावरही ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी ड्रोन उडवण्यास बंंदी घालण्याचे आदेश दिलेत. यासह हॉट हॉटएअर बलून, पॅराग्लायडर आणि पॅरामोटर्सच्या वापरलाही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान संवेदनशिल ठिकाणं वगळता इतर ठिकाणी ड्रोन उडवायचा असल्यास पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे.























