Nashik : नाशिकमध्ये पुरोहित संघाच्या अडचणीत वाढ, गोदाआरतीच्या वादाला आता नवं वळण ABP Majha
Nashik : नाशिकमध्ये पुरोहित संघाच्या अडचणीत वाढ, गोदाआरतीच्या वादाला आता नवं वळण
नाशिकच्या रामकुंडावरील गोदा आरतीवरुन पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीमध्ये सुरु असलेल्या वादात आता पुरोहित संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण पुरोहित संघाच्या ताब्यात असलेलं वस्त्रांतरगृह म्हणजेच चेंजिंग रुम ताब्यात घेण्याच्या हालचाली महापालिकाकडून सुरू झाल्यात. आता पोलीस बंदोबस्तात या वस्त्रांतर गृहाचा ताबा येत्या काही दिवसांत घेतला जाणार आहे. पुरोहित संघाच्या वतीने वस्त्रांतरगृहाचा अनधिकृतपणे वापर सुरू असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर महापालिकाने कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली होती. दरम्यान या कारवाईत पुढे काय होईल याकडे आता लक्ष लागलंय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
