एक्स्प्लोर
Nandurbar : परतीच्या पावसाचा मिरचीला फटका, 20 हजार क्विंटल लाल मिरची भिजली
परतीच्या पावसाचा फटका नंदुरबारमध्ये मिरचीला बसलाय. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 हजार क्विंटल मिरचीची खरेदी झाल्यानंतर वाळण्यासाठी टाकलेली सुमारे 20 हजार क्विंटल मिरची पावसात भिजली. त्यामुळे दोन ते अडीच कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय. नंदुरबार ही मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या बाजारपेठेत लाल मिरचीची मोठी उलाढाल होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजारपेठेत खरेदी केलेल्या मिरचीला पावसाचा मोठा फटका बसलाय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























