Gowaal Padavi Win Nandurbar Result 2024 : काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी, हिना गावित पराभूत
Nandurbar Lok Sabha Election Result 2024 : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पहिला विजय जवळपास निश्चित झाला असून नंदुरबारमधून गोवाल पाडवी (Goval Padvi) हे विजयी झाले आहेत.
नंदुरबारमध्ये भाजपच्या उमेदवार हीना गावित (Heena Gavit) या पिछाडीवर होत्या. आठव्या फेरीअखेर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी हे 22 व्या फेऱ्यात 1 लाख 64 हजार मतांनी आघाडीवर होते. आता गोवाल पाडवी यांचा विजय निश्चित झाला आहे. तर हिना गावित या पराभूत झाल्या आहेत.
Nandurbar Lok Sabha Election Result 2024 live : नंदुरबार काँग्रेस काबीज करणार
हिना गावित यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. तर गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी सभा घेतली होती. नंदुरबार हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मधल्या काळात भाजपाने येथे बस्तान बसवले होते. मात्र आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेस काबीज करणार असे दिसून येत आहे.
![Nandurbar Accident : नंदुरबार-सापुतारा घाटात खासगी बसचा अपघात, सात जणांचा मृत्यू ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/057c1e2cc9e91ef1eafd9f846b956c4d1738480315060718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rahul Gandhi Speech Nandurbar | महिलांना 3 हजार, बसचा प्रवासही मोफत राहुल गांधींची मोठी घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/14/8b5ef939c44703ac57a97b9ae72eb3f41731574572691719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nandurbar News : नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का, राजेंद्र गावित यांच्या बंधूंचा पक्षाला रामराम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/05/6a6d4192ab11971d09635dafc2059fda172811317983790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nandurbar : आदिवासी नेत्यांनी भाजप, शिवसेनेची उमेदवारी घेऊ नये : वळवी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/25/af60266612725858927368f290efcf7e1727235156805718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nandurbar ST : नंदुरबारमधील प्रवाशांवर एसटीत छत्री उघडून बसण्याची वेळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/06/73a6913f6d7392a2f6790cc608fd2a101725629870499719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)