एक्स्प्लोर
Nanded Hospital Deaths : नांदेडच्या रुग्णालयात 41 रुग्णांचा मृत्यू, हायकोर्टात सुमोटो याचिका दाखल
Nanded Govt Hospital Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूंची दखल आता मुंबई हायकोर्टानं घेतली असून मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सु-मोटो याचिका दाखल करून घेतली आहे. गुरुवारी सकाळी यावर तातडीची सुनावणी होणार आहे. राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. नांदेडमध्ये सोमवारी एकाच दिवसात 24 बळी गेले होते. त्यासंबंधित राज्य सरकारनेही चौकशीचे आदेश दिले आहेत.
आणखी पाहा























