एक्स्प्लोर

'संभाजीराजेंनी अर्धवट माहिती, लढाईची धार बोथट करण्याचा प्रयत्न', मंत्री वडेट्टीवारांचा आरोप

नागपूर : 'तुम्ही ओबीसीत का येत नाही?', अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केल्याचा दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र संभाजीराजे अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, यामुळे मला खेद आहे, अशी स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ओबीसीमध्ये यायचं असेल तर 27 टक्के आरक्षणामध्ये तुमचं 27 टक्के आरक्षण जोडा आणि वेगळा प्रवर्ग करा, असं संभाजीराजेंना म्हटल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. तसंच ओबीसीसाठी जी लढाई मी लढत आहेत, त्याची धार बोथट करण्याची ही खेळी असावी, अशी शंकाही वडट्टेवारी यांनी बोलून दाखवली.


'ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणामध्ये तुमचं 27 टक्के आरक्षण जोडा'
संभाजीराजेंच्या गौप्यस्फोटावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, "पाच-सहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत संभाजीराजे माझ्या शेजारी बसले होते. ते म्हणाले तुम्ही ओबीसी नेते आहेत. पण तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध का करता? यावर आम्ही कुठे विरोध करतोय, आम्ही विरोध करायचा विषयच नाही, असं उत्तर दिलं. तुम्हाला ओबीसीत यायचं असेल तर तुम्ही आताचा आमचा 27 टक्के कोटा आहे, त्यात तुम्ही 12 टक्के जोडून घ्या आणि तुमचा वेगळा संवर्ग करुन घ्या. 27 टक्के कोट्यामध्ये ओबीसीसाठी 19 टक्के, धनगर, वंजारी, भटक्या जाती, विमुक्त जमाती यांच्या हे सगळे मिळून आठ टक्क्यांचा समावेश आहे. या 27 टक्क्यांमध्ये 12 टक्के जोडल्यावर 39 टक्के होतात. यात एससी-एसटीचं आरक्षण मिळवलं तर ते 50 टक्क्यांच्या वर जातं. पुन्हा तोच विषय आडवा आला. आमच्या वाट्याचं तुम्ही घेऊ नका. हा समाज अत्यंत गरीब आहे. अनेकांना राहायला घर नाही, शिक्षणाचं प्रमाण 7 टक्के आहे. त्यात तुम्ही म्हणता आमच्यावर अन्याय का करता, आम्ही अन्याय करत नाही. तुम्हाला ओबीसीमध्ये प्रवेश हवा असेल तर 27 टक्क्यांमध्ये 12 टक्के जोडा, हे मी महाराजांशी चर्चा करताना बोललो होतो."


महाराज अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत, याचा खेद : वडेट्टीवार
संभाजीराजेंचा गोंधळ झाला का या प्रश्नावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, "माझ्या वक्तव्याचा अर्थ संभाजीराजेंनी काय घेतला किंवा त्यांची काय गफलत झाली, हे माहित नाही. माझं वक्तव्य, माझं बोलणं स्पष्ट होतं. आम्ही मराठा समाजातील गरीब मुलांच्या नुकसानीच्या आड येत नाही आणि येण्याचा विषयच नाही, अंस आम्ही वारंवार सांगितलं होतं. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या दिमतीला बहुजन समाजच होता. राजांची भूमिका एककल्ली असू नये. ते छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत. ज्या शाहू महाराजांनी शोषितांसाठी, गरिबांसाठी आरक्षणाची तजवीज केली, त्यांच्या वंशज केवळ मराठा समाजासंदर्भात वक्तव्य करत आहे, असा मेसेज जाऊ नये हे राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. आमची भूमिका ही मराठ्यांच्या, मराठा समाजाच्याविरोधात आहे, असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती की, आम्हाला आमच्या आरक्षणाला धक्का न पोहोचता तुम्हाला ओबीसीत यायचं असेल तर वेगळं मागा, त्याचा संवर्ग वेगळा करा, असं स्पष्टपणे मी महाराजांशी बोललो. पण महाराज अर्धवट बोलले, पूर्ण बोलले नाहीत त्यामुळे मला खेद वाटतोय."


Exclusive | 'वडेट्टीवार खाजगीत म्हणतात, मराठा समाजाला ओबीसीत घ्या' : संभाजीराजे छत्रपती


 

 

'संभाजीराजेंकडून लढाईची धार बोथट करण्याचा प्रयत्न'
संभाजीराजेंनी आपलं नाव घेऊन असं वक्तव्य का केलं असं तुम्हाला वाटतं? या प्रश्नावर विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, "खासगी चर्चा केली तर ते विषय सार्वजनिक करु नये हे आपण पाळतो. तरीही महाराज असं बोलत असतील की वडेट्टीवार ओबीसी नेता म्हणून लढत आहे तर ती धार बोथट व्हावी आणि ओबीसी समाज वडेट्टीवारांच्या विरोधात उभा व्हावा, ही त्यांच्या मनातली कदचित इच्छा असवी किंवा राजकारण असावं किंवा त्यांची खेळी असावी, असं मला वाटतं."


'ओबीसी समाजासाठी लढेन, मंत्रिपद महत्त्वाचं नाही'
"मी ओबीसीचं काम करणारा कार्यकर्ता, ओबीसी समाजात जन्मलेला आणि ओबीसीसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. ओबीसी समाजाचं वाईट होऊ देणार नाही. ओबीसी समाजासाठी मी लढेन, मला मंत्रिपद महत्त्वाचं नाही. समाज खितपत पडला आहे, त्याला न्यायाची गरज आहे, ती लढाई मी लढणार आहे," असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.


एमपीएससीच्या पुढच्या तारखांबद्दल अद्याप निर्णय नाही
सध्या तरी 11 तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. पुढच्या दोन परीक्षांसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणालो की आता परीक्षा ढकलताना जी तारीख निश्चिक कराल ती पुढे ढकलू नका. वारंवार तारखा बदलून समाजाचं नुकसान होता कामा नये. पुढच्या दोन तारखांबद्दल चर्चा होणं बाकी आहे. चर्चेनंतरच निर्णयापर्यंत येऊ. या परीक्षांच्या तारखा पुढच्या महिन्यात आहेत. त्यावेळी कोविडची परिस्थिती आणि राज्यातील स्थिती पाहूनच चर्चा आणि निर्णय होईल.

बातम्या व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?
पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल! जगातील सर्वात स्वस्त इंधन असलेले देश कोणते? अव्वल स्थानी कोण?
Sonam Wangchuk : मी उपोषण सुरु ठेवतोय, आंदोलकांवरील लाठीचार्जमुळं सोनम वांगचुक यांचा 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज 
23 व्या दिवशी उपोषण सुरुच ठेवणार, आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानं सोनम वांगचुक यांचा निर्धार 
Rahul Gandhi : प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना तुडवलं जातंय, लाठीचार्ज केला जातोय; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात!
प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना तुडवलं जातंय, लाठीचार्ज केला जातोय; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात!
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget