एक्स्प्लोर
Pravin Darekar | विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपकडून प्रवीण दरेकरांची नियुक्ती | एबीपी माझा
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपनं प्रवीण दरेकर यांची नियुक्ती केलीय. सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर, सुरेश धस, प्रसाद लाड अशा अनेक दिग्गजांना मागे टाकत प्रवीण दरेकरांनी बाजी मारलीय. शिवसेनेमधून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर दरेकरांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षाची भूमिका परखडपणे मांडण्याचा निर्धार दरेकरांनी बोलून दाखवलाय.तर भाजपात ओरिजिनल लोकांचे दिवस संपले अशा शब्दात दरेकरांच्या नियुक्तीवरुन टोला हाणलाय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















