Nagpur : नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन; प्रशासनाच्या सुधारित कायद्याला विरोध
महाराष्ट्र राज्य पशु वैद्यकीय आणि मत्स्य विद्यापीठासाठी राज्य शासनाकडून नवीन सुधारित कायदा मंजूर करण्य़ात आलाय. त्याला राज्यातील ६ शासकीय पशु वैद्यकीय आणि मत्स्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलाय. नवीन सुधारित कायद्यात पदविका अभ्यासक्रम हा बारावीनंतर तीन वर्षाचा केला. मात्र, एक पदविका अभ्यासक्रम दहावीनंतर दोन वर्षांच्या असताना परत नवीन नियम आणल्याने विद्यार्थांनी हा विरोध दर्शवलाय. तसंच महाविद्यालयाच्या मुख्य दाराला विद्यार्थ्यांनी कुलूप लावलं असून, कोणत्याही कर्मचाऱ्यांना आणि प्राध्यापकांना आत जाऊ देणार नाही अशी आक्रमक प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिलीये. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.. पाहूया.























