Nagpur Flood : पुराच्या दिवशी पहाटेच्या सुमारास 2 महिलांचा मृत्यू
आता बातमी आहे, नागपुरातून... नागपुरातील पुरात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. पुराच्या दिवशी पहाटेच्या सुमारास दोन वेगवेगळ्या घटनेत घरात झोपलेल्या मीरा पिल्ले आणि संध्या ढोरे दोन महिलांचा बुडून मृत्यू झाला होता.. तर एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सीताबर्डी परिसरातील नाग नदीच्या प्रवाहात तरंगताना आढळून आला होता.. त्या व्यक्तीची ओळख पटू शकली नव्हती.. तर आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे... कृष्णकुमार बरखंडी या बावीस वर्षाच्या तरुणाचा धंतोली परिसरातील एका हॉटेलच्या बेसमेंट मध्ये पाणी भरलेलं असताना इलेक्ट्रिक पंपाच्या सहाय्याने पाणी बाहेर काढत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे..तर संजय गाडेगावकर यांचा अजनी परिसरातील पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे...























