'राज्यात लॉकडाऊन नाही मात्र कडक निर्बंध!, आज सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय' : मंत्री विजय वडेट्टीवार
नागपूर : राज्यात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. काल तर राज्यात एकाच दिवशी 40 हजारांच्या वर कोरोना रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाचं संकट वाढल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात आधीच झालेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे.
केंद्राने अचानक लॉकडाऊन लावला, अनेकांचे जीव गेले तसेच रोजगार गेले, आम्हाला ती परिस्थिती राज्यात परत आणायची नाही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमच्या पक्षाचे नेते सर्व लॉकडाऊनच्या विरोधात आहेत. मात्र राज्यभरात कडक निर्बंधावर चर्चा होणार. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आमच्या विभागाने फाईल पाठवली आहे. अंतिम निर्णय आज संध्याकाळी होईल, असं वडेट्टीवार म्हणाले.























