Cruise Drugs Case : NCBचे झोनल अधिकारी समीर वानखेडे दिल्लीसाठी रवाना, चौकशीसाठी 3 अधिकाऱ्यांची समिती
एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. क्रूझ ड्रग्ज कारवाईत एनसीबीचे पंच प्रभाकर साइल यांनी आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटींची डील झाल्याचा आरोप केला हाते. यामध्ये मध्यस्थी किरण गोसावी आणि सॅममधील संभाषणात समीर वानखेडेंनी 8 कोटी देण्याचा उल्लेख होता असा आरोप त्यांनी केलाश आहे. दरम्यान आता याप्रकरणी वानखेडेंच्या चौकशीसाठी एनसीबीच्या दक्षता समितीच्या 3 अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. समीर वानखेडेंची चौकशी करणारी समिती उद्या मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आज अनन्या पांडे एनसीबी चौकशीसाठी गैरहजर राहिली. वैयक्तिक कारणांमुळे अनन्या चौकशीला उपस्थित राहणार नाही अशी माहिती एनसीबी सूत्रांनी दिलीय.























