Varsha Gaikwad on Adani Group :मदर डेअरीची जागा अदानी समूहाला देण्यास विरोध;वर्षा गायकवाडांचं आंदोलन
कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समुहाला ही जागा देऊ नये यासाठी खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह स्थानिकांनी अनेक दिवसांपासून आंदोलन केलं होतं. मात्र हा विरोध न जुमानता राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जागा प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता कुर्ल्यातील जवळपास ८.५ हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात आलीय.
या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी
वर्षा कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला
प्रकल्पाच्या नावाखाली जागा अदानी समुहाला देण्याचा घाट- गायकवाड
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला
मुंबईतील सर्व मोक्याच्या जागा अदानीला देण्याचं काम-वर्षा गायकवाड
सरकारने कितीही प्रयत्न केला तरी आमचा विरोध कायम राहणार-वर्षा गायकवाड
आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करणार-वर्षा गायकवाड





















