Vamanrao Pai Jayanti : मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये वामनराव पै यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन
Mumbai : समाज सुधारक आणि तत्वज्ञ वामनराव पै (Vamanrao Pai Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईतील दामोदर हॉल (Damodar Hall)येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज पासून वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात झाली आहे. त्याचेच औचित्य साधून पुढील एक वर्षात संस्कार शिक्षण अभियान, व्यसन मुक्ती अभियान, ग्राम समृध्दी अभियान, अवयव दान अभियान, कौटुंबिक सौख्य अभियान, बाल संस्कार अभियान, कॉर्पोरेट कोर्सेस राबविण्यात येणार आहेत. आज दामोदर हॉल येथे हजारोंच्या संख्येने वामनराव पै यांचे अनुयायक जमले होते. या सर्व अनुयायांना अमरावती यांचे सुपुत्र प्रल्हाद वामनराव पै यांनी प्रबोधनात्मक भाषण केले. जीवन विद्या मिशन ट्रस्ट तर्फे पुढील एक वर्षासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या























