Thane Lok Sabha Election : निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान; ठाण्यात मतदानापूर्वीची तयारी पूर्ण
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. देशातील एकूण ६ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ४९ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या १३ जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिहिर कोटेचा, अरविंद सावंत, अनिल देसाई, उज्ज्वल निकम, अमोल कीर्तिकर, पियुष गोयल अशा दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.
मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांसह आज एकूण १३ जागांवर मतदान, नाशिक, दिंडोरी आणि धुळ्यातही मतदार बजावणार हक्क तर निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज देशभरात एकूण ४९ जागांवर मतदान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं भवितव्यही ईव्हीएममध्ये कैद होणार























