South Mumbai Lok Sabha : Arvind Sawant vs Yamini Jadhav ? दक्षिण मुंबईत कोणाचा डंका वाजणार?
LokSabha Election 2024: लोकसभा निवडणुक 2024 च्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 49 लोकसभा मतदारसंघात मतदानाचा घटता कल कायम राहिला आहे. महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालं. मात्र या टप्प्यात 13 मतदारसंघातली मतदानाची टक्केवारी अतिशय निराशाजनक राहिलीय. राज्यात सरासरी 54.33 टक्के मतदान झालं. मुंबईत काल मतदान पार पडल्यानंतर दक्षिण मुंबईत (South Mumbai Loksabha) कमी मतदान झाल्याचे पाहायला मिळालं. दक्षिण मुंबईत 47.70 टक्के मतदान झालं. दक्षिण मुंबईत 2019 च्या तुलनेत चार टक्के मतदान काल कमी असल्याचे पाहायला मिळालं. याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली, जाणून घ्या.
- काल नियोजनाचा प्रचंड अभाव जाणवला अनेक ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी आले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना मतदानाची प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागत असल्याचं पाहायला मिळालं. पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांकडे वेगवेगळे ॲप होते. ज्यामध्ये मतदारांची नावे लगेचच मिळत होती. मात्र निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना लिस्टमध्ये नाव शोधण्याचे वेळ आली होती. यातच अनेक वेळा वेळ जात असल्याचा पाहायला मिळालं, असं एका नागरिकाने सांगितलं.