डोंबिवलीत आज 1 रुपयात 1 लीटर पेट्रोल ; आदित्य ठाकरेंचा बर्थ डे, मोदींना 'गिफ्ट' देणार
गेल्या वर्षभरापासून पेट्रोलचे दर हे दिवसागणिक वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.कल्याण डोंबिवलीमध्ये देखील पेट्रोलचे दर 102 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत . डोंबिवली मध्ये एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंप वर आज युवा सेनेच्या वतीने सकाळी 10 ते 12 या कालावधीत एक रुपया एक लिटर पेट्रोल देण्यात आलं. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले .दरम्यान हे पेट्रोल भरण्यासाठी आज शेकडो नागरिकांनी पेट्रोल पंप रांगा लावल्या होत्या उस्मा पॅटर्न सुरू झालेली ही रांग पेंढारकर पर्यंत पोहोचली होती. या रांगेचे नियोजन करण्यासाठी शिवसैनिक देखील तैनात होते यावेळी पेट्रोल भरण्यास येणाऱ्या नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले तसेच पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी देखील यावेळी केली.