Mumbai: मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यानंतर शिवसेनेची Narayan Rane यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं.
नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांची जीभही घसरली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाडमध्येही गुन्हा दाखल... gane
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात महाडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्र्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यावरून नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडचे युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर याच्यां तक्रारीनंतर नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 189, 504, 505(2) आणि 506 या कलमांतंर्गत नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजप कार्यकर्त्यांवरही आपत्ती व्यवस्थापन अतंर्गत गुन्हा दाखल केला गेला आगे. शंभर ते सव्वाशे जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
