Sanjay Raut on Tanajai Sawant : तानाजी सावंत यांना डॉक्टरेट दिली पाहिजे : संजय राऊत
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अतिशय धाडसी वक्तव्य केलं आहे. ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना गर्दी जमवता आली नाही, तिथं सावंत बंधूंनी ७ लाखांची गर्दी जमवून दाखवली, असं सावंत एका कार्यक्रमात म्हणाले.. मोठेपणाच्या ओघात आरोग्यमंत्री बोलून गेले असले तरी त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं लागणार हे स्पष्ट आहे.. कारण बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींपेक्षा आपण मोठे आहोत, हे त्यांनी एका वाक्यात सुचवण्याचा प्रयत्न केला.. त्यामुुळे एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री फडणवीसांसह संपूर्ण भाजपचा रोष त्यांनी ओढावून घेतलाय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान राऊतांनी यावर काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात























