Sandeep Deshpande on Attack : माझ्यावरील हल्ल्यामागे राऊत बंधूच, देशपांडे आरोपांवर ठाम
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला (MNS Leader Sandeep Deshpande Attack) प्रकरणी माहिती समोर आली आहे. अशोक खरात यांनी हल्ला केल्याचा
चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याने उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळवण्यास मदत होईल असा आरोपी खरात याला विश्वास वाटत होता ही बाब जबाबात उघड झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.
उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत आल्यानंतर बक्षीस देतील म्हणून महाराष्ट्र राज्य माथाडी आणि कामगार सेनेच्या अशोक खरात याच्याकडून हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेने निलेश पराडकरला फरार आरोपी दाखवलं आहे. या हल्ल्यात अद्याप तरी राजकीय अँगल नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. निलेश पराडकरचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.