Sachin Vaze | सचिन वाझे यांच्या कंपन्यांचे ऑफिस एक वर्षापासून बंदच
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे डायरेक्टर असलेल्या कंपन्यांचे नोंदणीकृत कार्यालय गेले 1 वर्ष बंदच आहे. टेकलीगल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते डायरेक्टर आहेत. या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ठाणे सत्र न्यायालयाच्या बाजूला असलेल्या केळकर कंपाऊंडमध्ये आहे. मात्र ते गेले 1 वर्ष बंदच आहे. या कार्यालयात वाझे नियमित यायचे. मात्र गेल्या वर्षी मुंबई पोलिसात पुन्हा रुजू झाल्यानंतर ते या कार्यालयात यायचे बंद झाले. याच ठिकाणी स्वरुप सिक्युरिटी फोर्स आणि एम जे असोसिइट्स या कंपन्यांच्या कार्यालयाची देखील नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच वाझे डायरेक्टर असलेल्या डिजीनेक्स्ट मल्टी मीडिया लिमिटेड आणि मल्टीबिल्ड इन्फ्रा प्रोजेट्स लिमिटेड या कंपन्यांचे ऑफिस देखील हेच असल्याचे कळते आहे.






















