Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरचा बंगला होणार 5 मजल्यांचा, CRZ प्राधिकरणाकडून मिळाली मंजुरी
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वांद्रे येथील बंगल्याचे मजले वाढविण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पाच मजल्यांपर्यंत बांधकाम वाढविण्याचे तेंडुलकर यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वांद्रे पश्चिममधील पेरी क्रॉस रोडवर तेंडुलकर यांनी बंगला बांधला. मात्र ही जागा सीआरझेड-2 मध्ये येत असल्यानं एफएसआय केवळ एकचा मिळाला. त्यानुसार सचिननं साडे तीन मजल्यांचा बंगला उभारला. 2019 मध्ये नियमात बदल होऊन 0.5 इतका वाढीव एफएसआय देण्यात आला. त्या आधारे तेंडुलकर व पत्नी डॉ. अंजली यांनी महापालिका आणि सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे.




















