Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
Chhatrapati Sambhaji nagar news: मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलगा डोंगरावरुन जीव द्यायला गेला, आई-वडीलही खाली पडले, तिघांचा जागेवरच मृत्यू

Chhatrapati Sambhaji nagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी एका मुलासह त्याच्या आई-वडिलांचा डोंगरावरुन पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव भागातील खवड्या डोंगरावर (Khavdya Dongar) एक 18 वर्षाचा मुलगा आत्महत्या (Suicide news) करायला गेला होता. त्यावेळी त्याचे आई-वडील आणि स्थानिक लोक त्याला वाचवण्यासाठी डोंगरावर गेले. आई-वडील आणि इतर लोक त्या मुलाला उडी मारु नकोस, असे समजावत होते. मात्र, मुलगा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. वडील आपल्या मुलाची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. अखेर वडिलांनी पुढे जात मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मुलाने डोंगरावरुन उडी टाकली होती, त्याला पकडण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही खाली तोल जाऊन तेदेखील खाली पडले. हे दोघेही डोंगराच्या दरीत खाली पडताच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार पाहून शोक अनावर झालेल्या मुलाच्या आईनेही डोंगरावरुन खाली उडी मारली. त्यामुळे तिचाही मृत्यू झाला. या घटनेने घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला. मुलाने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कुणाल मुरलीधर चांदवडे,मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण देवळाई सातारा परिसर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. ( Maharashtra Crime news)
कुणाल चांदवडे हा 18 वर्षांचा मुलगा सकाळी दहा वाजता खवड्या डोंगरावरुन उडी मारुन जीव देण्यासाठी गेला होता. ही गोष्ट त्याच्या आई-वडिलांना समजल्यावर ते तिकडे आले होते. यानंतर जवळच्या गावातील लोक, पोलीस, अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. सकाळी 10 वाजल्यापासून हे सर्वजण मुलाला उडी मारु नकोस, म्हणून विनवणी करत होते. मात्र, कुणाल चांदवडे हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे वडील त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा ते त्याच्यापर्यंत पोहोचले, मात्र, तोपर्यंत कुणालने आपले शरीर खाली झोकून दिले होते. त्यामुळे त्याला वाचवताना मुरलीधर चांदवडे यांचाही तोल गेला आणि दोघेही एकत्रच खाली पडले. या दोघांचा उंचावरुन खाली पडल्यामुळे जागेवरच मृत्यू झाला. हे दृश्य पाहून शोक अनावर झालेल्या आईनेही मागचा पुढचा विचार न करता डोंगरावरुन खाली उडी टाकली. या तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला. मन विषण्ण करणाऱ्या या घटनेने सगळेच जण हादरले आहेत.
आणखी वाचा






















