MNS Protest Siddhivinayak Trust : सिद्धिविनायक मंदिरा बाहेर मनसें आंदोलन, ट्रस्टवर गैरव्यवहाराचा आरोप
MNS Protest Siddhivinayak Trust : सिद्धिविनायक मंदिरा बाहेर मनसे कार्यकर्ते घोषणाबाजी करत बसले आहेत. सिद्धिविनायक मंदिरातील कथित आर्थिक व्यवहाराचा आरोप करत मनसे आक्रमक. आगर बाजार ते सिद्धिविनायक मंदिर मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मोर्चा. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी देणगी स्वरूपात दिलेल्या पैशांचा गैर व्यवहार केल्याचा मनसेचा आरोप. कोरोना काळात शिवभोजन थाळी त्यासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर ठिकाणी सिद्धिविनायक मंदिराने दिलेल्या पैशात गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. या सगळ्या व्यवहाराची चौकशी मनसेने केली असून या विरोधात आज सिद्धिविनायक मंदिर परिसरात मोर्चा काढण्यात येत आहे.























