Poonam Pandey on Raj Kundra : "मी 2019 साली राज कुंद्राविरोधात पोलिसात तक्रार केली होती": पूनम पांडे
मुंबई : ग्लॅमरच्या दुनियेच्या झगमगाटामागे किती अंधार आहे आणि त्यात किती काळी कृत्य केली जातात हे शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झालं. व्यावसाईक असलेल्या राज कुंद्राला पॉर्न रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. राज कुंद्रावर पॉर्नोग्राफिक फिल्म बनवणे आणि काही अॅपवर ती पब्लिश केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यासंबंधी आपल्याकडे प्रबळ पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.
सोमवारी राज कु्ंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने चौकशीसाठी बोलवले होते. सात तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवणे आणि काही अॅप्सवर ते दाखवल्याबद्दल क्राईम ब्रान्चने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या




















