Sanjay rathod | वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, विश्वसनीय सूत्रांची माहिती
वनमंत्री संजय राठोड यांना आता राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी राठोड यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. संजय राठोड प्रकरणावरुन सरकारची नामुश्की झाल्यामुळे हा मोठा निर्णय होणार असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
संजय राठोड अधिवेशानपूर्वी राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संजय राठोड प्रकरणी एक सूचक वक्तव्य केलं होतं की, मुख्यमंत्री सर्व काही पाहत आहेत. आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. त्यामुळे एकंदरीत मुख्यमंत्र्यांवर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्नावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजप आक्रमक झालं असून राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.