Mumbai Unlock : मुंबईकरांना दिवाळी भेट; दिवाळीपूर्वी निर्बंध आणखी शिथिल ABP Majha
आता बातमी तुमचा मूड बदलणारी. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्यामुळं मुंबईतली हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि दुकानं रात्री १२ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना आता रात्री एक वाजेपर्यंत ऑर्डर घेता येणार आहे. टास्क फोर्स आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार? याची घोषणा आज करण्यात आलेली नाही. पण ती घोषणा लवकरच केली जाणार आहे. राज्यातल्या इतर शहरांमधल्या दुकानांच्या आणि हॉटेलांच्या वेळांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. चित्रपटगृहं आणि नाट्यगृह यांच्यासह राज्यातली अॅम्युझमेंट पार्कही २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानं यंदाची दिवाळी बऱ्याच अंशी निर्बंधमुक्त साजरी करता येणार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाबाबत नेमकी काय माहिती दिली आहे आणि लोकलबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काय म्हटलंय बघुयात