Mumbai Power Cut | Nitin Raut PC | मुंबईतील वीज खंडित प्रकरणी चौकशी करणार : ऊर्जामंत्री नितीन राऊत
महापारेषणच्या कळवा- पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई मधील वीज खंडीत झाली होती. याच्या cascading effect मुळे मुंबई व मुंबई उपनगरातील वीज देखील खंडीत झाली आहे. महापारेषण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत . वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्याची चौकशी करणार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
मुंबईमध्ये आज (12 ऑक्टोबर) सकाळी अचानक अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे. मुंबईतील मोठ्या भागातील विजप्रवाह खंडीत झाल्याने मुंबई अंधारात गेली होती. आता मुंबई हळुहळु पुर्वपदावर येत असून मुंबई आणि मुंबई उपनगरात वीज पुरवठा सुरळीत सुरु झाला आहे. रेल्वे तसेच सिग्नल सेवाही हळुहळु सुरळीत होत आहे तर शासकीय कार्यालयांमध्ये वीज पुरवठा सुरु झाला आहे.