Mumbai Sakinaka Case: एका महिन्यात गुन्हा उघडकीस आणून तपास पूर्ण करणार : पोलीस आयुक्त नगराळे
Mumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका (Mumbai Sakinaka Rape Case) येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कारकेल्याची घटना काल (शुक्रवारी) समोर आली होती. दुर्दैवाने पीडितेची मृत्यूशी झुज थांबली आहे. या घटनेसंदर्भात आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली. घटनेनंतर काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नराधाम चौहानला 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. एक महिन्याच्या आतमध्ये हा संपूर्ण गुन्हा उघडकीस आणून याचा तपास पूर्ण करण्यात येईल. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचेही आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले आहे.
खैरानी रोडवर महिला जखमी असल्याचं कळल्यावर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्वतः जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असून 21 सप्टेंबरपर्यंत 10 दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे. या घटनेसंदर्भात सुरक्षा रक्षकांकडून पहिल्यांदा माहिती मिळाली. एका महिन्याच्या आत संपूर्ण गुन्हा उघडकीस आणून याचा तपास पूर्ण करण्यात येईल. या गुन्ह्यात जास्त आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, आतापर्यंतच्या तपासात एकच गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेचा जबाब नोंदवता आला नाही. त्यामुळे या घटनेत नेमकं काय झालं? याबद्दल अद्याप काहीच माहिती मिळाली नसल्याचं आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं आहे.
![SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/412796c9d0af7c42f70639c88a4adaff1737191153416718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/5642b5baeaecde6e450f914dbafe078b1737189900965718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/302d8524f01272e874ae0a3b4cf968391737188117600718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/e709ae9a60412c3284b7077a2c6171691737183066095718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Praful Patel Shirdi : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोलले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/50742e62866179b5744559d8efa9780a1737181781828718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)