MNS Sandeep Deshpande : Raj Thackeray यांच्या आदेशानुसार सर्व जागा लढवणार : संदीप देशपांडे
राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करणार का? या प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली असतानाच मनसेनं एकला चलो रेचा नारा दिला आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबई महापालिकांमध्ये मनसेनं सर्व जागांवर लढण्याची तयारी सुरु केल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. गेल्या काही दिवसांत भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यामधल्या गाठीभेटी वाढल्या होत्या. तसंच एकमेकांच्या घरी गणपती दर्शनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हेही दोनवेळा एकमेकांना भेटले. त्यामुळं मनसेच्या इंजिनाला भाजप आणि शिंदे गटाकडून इंधन मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मनसेनं स्वबळाचा नारा देऊन आपली भूमिका स्पष्ट केली.























