Gunratna Sadavarte on Maratha Reservation : वेगळा वर्ग करुन मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकारच नाही
मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी आहे. राज्य सरकारनं देऊ केलेल्या १० टक्के मराठा आरक्षणाला डॉ. जयश्री पाटील यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. तर त्यांचे पती गुणरत्न सदावर्ते यांनी दिवाणी रीट याचिका दाखल केली आहे. प्रथमदर्शनीच हे आरक्षण बेकायदेशीर आहे, कारण राज्य सरकारला वेगळा वर्ग तयार करून मराठ्यांना आरक्षण देण्याचा मुळात अधिकारच नाही, असा दावा सदावर्ते यांनी केला आहे. कुणबी - मराठा असा वर्गही होऊ शकत नाही, तसंच मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणही देता येणार नाही, कारण या आरक्षणामुळे राज्यातील आरक्षण 72 टक्क्यांवर गेलं आहे, जे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोेधात आहे असा सदावर्ते यांचा युक्तिवाद आहे. यावर सुनावणी कधी होणार ते लवकरच कळणार आहे.























