ED summons to Kapil Sharma and Huma Qureshi : कपिल शर्मा आणि हुमा कुरेशीला ईडीचं समन्स- सूत्र
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला महादेव गेमिंग अॅप प्रकरणात ईडीने समन्स बजवल्यानंतर आता आणखी दोन अभिनेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. कॉमेडीयन कपिल शर्मा आणि अभिनेत्री हुमा कुरेशीला ईडीकडून समन्स जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान अभिनेता रणबीर कपूरची शुक्रवारी ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पंरतु त्यासाठी रणबीर कपूरकडून दोन आठवड्यांचा वेळ मागण्यात आला होता.. महादेव अॅपप्रकरणी ईडीकडून सध्या चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची नावं सध्या पुढे येत आहेत. या अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी महादेव बुक अॅपसाठी जाहिरात केली असल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे.























