(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron : द. आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण, व्हेरियंट कोणता हे अद्याप अस्पष्ट
दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळलाय. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झालीय. या रुग्णाचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी मुंबईत पाठवले जाणार आहेत. या प्रवाशाला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे की नाही? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून 24 नोव्हेंबर रोजी दिल्लीत आला होता. त्यावेळी दिल्ली एअरपोर्टला केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याने आपल्या कुटुंबियांना याची कल्पना दिली होती .यामुळे त्याच्या घरातील सर्व सदस्य नातेवाईकांची घरी शिफ्ट झाले होते. तो एकटाच घरी विलगीकरणात राहत होता. मात्र त्याला ताप येऊ लागल्याने त्यानं टेस्ट केली असता कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. या रुग्णाला आता पालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आलंय. त्याच्या टेस्टचे नमुने जिनोम सिक्वेन्सीग साठी मुंबई येथे पाठवले जाणार आहेत.